पिंपोडे बुद्रुक ते वाठार रस्त्याची दुरावस्था; नागरिक त्रस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी

पिंपोडे बुद्रुक ते वाठार रस्त्याची दुरावस्था; नागरिक त्रस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी

पिंपोडे बुद्रुक  प्रतिनिधी – 

वाठार दरम्यानचा रस्ता अक्षरशः जीवघेणा ठरत असून नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, कामगार यांना दररोज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या प्रचंड वाढली असून डांबर पूर्णतः उखडून निघाले आहे. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना रस्त्याची स्थिती कळत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

दररोज शेकडो नागरिक या रस्त्याने प्रवास करतात. शेतकऱ्यांना आपला शेतीमाल बाजारात नेण्यात अडथळे येत आहेत, तर विद्यार्थ्यांना शाळा-काॅलेजला जाण्यासाठी तासन्तास त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कामगार व प्रवासी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने या रस्त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक संघटनांनी अनेकदा संबंधित विभागाचे लक्ष वेधले असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पिंपोडे बुद्रुक – वाठार हा परिसराशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने तातडीने दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

“आम्हाला सुरक्षित रस्ता हवा आहे, रोजचा प्रवास हा आमच्यासाठी जीवघेणा प्रकार होऊ नये,” अशी मागणी स्थानिक नागरिक करत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, हीच जनतेची एकमुखी मागणी आहे. 


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl