महाडमध्ये खासदार तटकरे यांना मोठा धक्का; माजी सरपंच संजय देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश

महाडमध्ये खासदार तटकरे यांना मोठा धक्का; माजी सरपंच संजय देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश

 पोलादपूर प्रतिनिधी  (प्रकाश कदम) :
महाड तालुक्यातील नडगाव परिसरात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू आणि नडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय देशमुख यांनी काल घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रवादीची साथ सोडत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री आणि महाडचे आमदार भरतशेठ गोगावले तसेच युवा सेना कोअर कमिटी सदस्य व कोकण सचिव विकास शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत पार पडला.

🔸 राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्का
मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पायाभूत शक्तीला हादरे देण्याचे काम सुरू ठेवले आहे. नुकतेच महाड शहरातील संत रोहिदास नगर येथील अनेक कार्यकर्त्यांनी घड्याळाचे चिन्ह सोडून शिवसेनेचा भगवा हातात घेतला होता. त्यानंतर काल माजी सरपंच संजय देशमुख यांनी पक्षप्रवेश करून राष्ट्रवादीसाठी आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

🔸 विश्वास गोगावले कुटुंबाच्या नेतृत्वावर
नडगाव ग्रामपंचायतीत अपक्ष म्हणून निवडून येत सरपंच पद भूषवलेले आणि नंतर खासदार सुनील तटकरे यांच्या विश्वासावर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले देशमुख गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना युवा नेतृत्व विकास गोगावले यांच्या संपर्कात होते. अखेर त्यांनी मंत्री भरतशेठ गोगावले आणि विकास गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला.

🔸 मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेत
देशमुख यांच्यासह सोमनाथ सखाराम महाडिक, गजानन दिनकर महाडिक, नथुराम मारुती महाडिक, अभय बळीराम देशमुख, गणित संजय देशमुख, राजेश सुमित देशमुख, बिपिन सखाराम खोपडे, साहिल जितेंद्र पाटेकर, जगदीश मोरे, पुष्कर गबाळे, हर्षद महाडिक, कृणाल टमके, मुकेश मनोहर महाडिक, अशोक अरुण महाडिक, शांताराम बाबुराव खोपडे, रोहिदास टमके, महादेव रामचंद्र महाडिक, सुभाष कृष्णा महाडिक, सुनील परशुराम महाडिक, नागेश भागोजी महाडिक, गणपत शांताराम महाडिक, मनोहर शांताराम महाडिक, संतोष रघुनाथ महाडिक, संदीप गणपत महाडिक, दिनेश सकपाळ, संतोष कृष्णा महाडिक, राजेंद्र भिवा पवार, ज्ञानेश्वर कवितके आणि सुरेश चंद्रकांत कोळी या कार्यकर्त्यांनीही एकत्रितपणे शिवसेनेचा ध्वज हाती घेतला.

🔸 नडगावमध्ये शिवसेनेची ताकद दुप्पट
या पक्षप्रवेशामुळे नडगाव ग्रामपंचायतीत शिवसेनेचे आधीच असलेले वर्चस्व आणखी दृढ झाले असून पक्षाची ताकद दुप्पट झाली आहे. मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या विकासकामांचा धडाका, तरुण नेतृत्वाची कार्यतत्परता आणि स्थानिक पातळीवरील खंबीर संघटनशक्तीमुळे शिवसेनेचा पाया अधिक मजबूत झाला आहे.

👉 या प्रवेशामुळे महाड तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्याने रंगू लागली असून खासदार सुनील तटकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl