पोलादपूर तालुक्यासाठी मोफत रुग्णवाहीका व दवाखान्याचे लोकार्पण


पोलादपूर प्रतिनिधी (प्रकाश कदम)

पोलादपूर, ता. रायगड : ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना तत्काळ व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूर तालुक्यात मोफत रुग्णवाहीकामोफत दवाखान्याचा लोकार्पण सोहळा भव्य उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे लोकार्पण शिवसेना उपनेते व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेशजी सांबरे तसेच युवासेना कोअर कमिटी सदस्य श्री. विकासशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख व माजी उपाध्यक्ष राजीप श्री. चंद्रकांतजी कळंबे, पोलादपूर नगरपंचायत अध्यक्षा सौ. शिल्पाताई दरेकर उपस्थित होते. त्यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित राहून या उपक्रमाला बळ दिले.

कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख श्री. निलेशजी आहिरे, युवासेना समन्वयक श्री. इम्रान भाई पठाण, नायक मराठा समाज अध्यक्ष पोलादपूर श्री. सुनील मोरे, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. सुवर्णाताई कदम, विभाग प्रमुख श्री. लक्ष्मण मोरे, श्री. तानाजी निकम, माजी नगराध्यक्षा सौ. सोनालीताई गायकवाड, महिला आघाडी शहर प्रमुख अस्मिताताई पवार, नगरसेवक श्री. सिद्देश शेठ, नगरसेवक श्री. विनायक दीक्षित, श्री. निखिल काफडेकर, नगरसेविका सौ. स्नेहा मेहता, युवासेना शहर प्रमुख कु. प्रसाद मोरे, युवासेना संपर्क प्रमुख श्री. निलेश किंक व युवासेना उपविभाग प्रमुख मंगेश पवार यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात बोलताना श्री. निलेशजी सांबरे यांनी ग्रामीण व डोंगरी भागातील जनतेच्या आरोग्याच्या समस्या ओळखून जिजाऊ संस्था व शिवसेना यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. मोफत रुग्णवाहीका व दवाखाना सुरू झाल्याने पोलादपूर तालुक्यातील नागरिकांना त्वरित उपचार व आपत्कालीन सेवा सहज उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री. विकासशेठ गोगावले यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करताना, "आरोग्य हे प्रत्येकाचे मूलभूत हक्क आहे. त्यासाठी मोफत व तत्काळ सेवा पुरवणे ही काळाची गरज आहे आणि आज पोलादपूर तालुक्याला ही महत्त्वाची सेवा उपलब्ध झाली आहे," असे उद्गार काढले.

या उपक्रमामुळे पोलादपूर तालुक्यातील सामान्य, आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार असून, स्थानिक जनतेकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl