सोमेश्वर विकास सेवा सोसायटीकोट्रोशी ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न : जिल्हा बँकेकडून नवीन इमारत व गोडाऊनसाठी मदतीची घोषणा



सोमेश्वर विकास सेवा सोसायटीकोट्रोशी ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न : जिल्हा बँकेकडून नवीन इमारत व गोडाऊनसाठी मदतीची घोषणा

 जितेंद्र कारंडे ,
 प्रतापगड प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्यातील दहा गावांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या सोमेश्वर विकास सेवा सोसायटी, कोट्रोशी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या सभेत संस्थेचा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक मांडण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी संस्थेची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याचे गौरविले तसेच सोसायटीसाठी अद्ययावत इमारत व गोडाऊन उभारणीस जिल्हा बँक आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा केली.

सभा कोट्रोशी येथील सोमेश्वर मंदिर परिसरात झाली. यावेळी सोसायटीच्या चेअरमन दीपा मोरे, शिवसेना तालुका प्रमुख संजय शेलार, संचालक प्रकाश मोरे, भाऊसाहेब मोरे, डॉ. प्रमोद शेलार तसेच संस्थेचे सर्व संचालक, सभासद व विविध गावांचे सरपंच उपस्थित होते.

जिल्हा बँकेचे संचालक राजपुरे म्हणाले, “सोसायटीच्या सर्व सभासदांपर्यंत जिल्हा बँकेच्या योजना पोचल्या पाहिजेत. कर्जदारांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले तर संस्थेचा व्यवसाय आणि नफा वाढेल व संस्था अधिक भक्कम बनेल.”

चेअरमन दीपा मोरे यांनी संस्थेच्या यशाचा आढावा घेत सांगितले की, “या आर्थिक वर्षात संस्थेला सुमारे १३ लाख रुपयांचा नफा झाला असून सभासदांना यंदा १० टक्के लाभांश देण्यात येणार आहे.”

सभेत संस्थेचे सचिव राजू मोरे यांनी ताळेबंद व नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले. तर प्रकाश मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सभेत उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून भविष्यात अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत सेवा पोहोचवावी, असे मत व्यक्त केले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl