प्रतापगडावर शारदीय नवरात्र उत्सवाची धामधूमआई भवानी मंदिर स्थापनेला ३६६ वर्षे पूर्ण – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन

प्रतापगडावर शारदीय नवरात्र उत्सवाची धामधूम
आई भवानी मंदिर स्थापनेला ३६६ वर्षे पूर्ण – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन

प्रतापगड वार्ताहर (जितेंद्र कारंडे)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि आई भवानीच्या कृपाशीर्वादाने हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेला प्रतापगड किल्ला यंदा पुन्हा एकदा धार्मिक उत्सवाच्या रंगात नटला आहे. गडपती शिवरायांनी विजापूरच्या उन्मत्त अफजलखानाचा पराभव येथेच करून हिंदवी स्वराज्याच्या संघर्षाला निर्णायक वळण दिले. त्या पराक्रमाच्या स्मरणार्थ महाराजांनी प्रतापगडावर महिषासुरमर्दिनी भवानीचे मंदिर बांधले. या मंदिर स्थापनेला यंदा ३६६ वर्षे पूर्ण होत आहेत.

या निमित्ताने सोमवार, २२ सप्टेंबर ते गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हा महोत्सव श्रीमंत राजमाता कल्पनाराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून, भाविकांची मोठी गर्दी प्रतापगडावर अपेक्षित आहे.

दररोज सकाळी आई भवानीला अभिषेक, महाआरती, पुराणवाचन, तसेच सायंकाळी पूजा, सनई-चौघडा आणि जागराचे आयोजन केले जात आहे. रात्री महाआरतीनंतर पारंपरिक गोंधळ, ढोल-लेझीम आणि ग्रामस्थांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

२२ सप्टेंबर रोजी अभिषेक, ध्वजारोहण, घटस्थापना आणि महाआरतीने उत्सवाची सुरुवात .

२६ सप्टेंबर रोजी पालखी मिरवणुकीचे आयोजन असून, ब्राह्मणवृंदाद्वारे सप्तशती पाठवाचन होणार आहे.

२७ सप्टेंबर रोजी किल्ले प्रतापगडावरील सर्व भाविकांचे आकर्षण असणारा मशाल उत्सव होणार आहे.

२८ सप्टेंबर रोजी महाप्रसाद, छत्रपती महोत्सवाचा विशेष कार्यक्रम व स्वराज्य ढोल-लेझीम पथकाचे सादरीकरण भाविकांना अनुभवायला मिळणार आहे.

१ ऑक्टोबर रोजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विशेष  शतचंडी  यज्ञाचे आयोजन आहे.

२ ऑक्टोबर रोजी पालखी मिरवणूक, सोने लुटणे, पारंपरिक ढोल-लेझीम, आतिषबाजी आणि सेवकांचा सन्मान सोहळा होऊन महोत्सवाची सांगता होणार आहे.

आई भवानी मंदिर व्यवस्थापक, सेवकवर्ग आणि ग्रामस्थ मंडळींच्या वतीने सर्वांना या उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धार्मिक भावनांसह ऐतिहासिक वैभवाचा संगम अनुभवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने प्रतापगडावर दाखल होण्याची अपेक्षा आहे.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl