पर्यटकांचा मोबाईल परत देऊन प्रामाणिकपणाचे उदाहरण; महाबळेश्वरची सौंदर्य व माणुसकी अनुभवून पर्यटक भारावले

पर्यटकांचा मोबाईल परत देऊन प्रामाणिकपणाचे उदाहरण; महाबळेश्वरची सौंदर्य व माणुसकी अनुभवून पर्यटक भारावले 
जितेंद्र कारंडे 
प्रतापगड प्रतिनिधी –
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाबळेश्वर हे केवळ हिरव्यागार दऱ्यांनी, डोंगररांगा आणि धबधब्यांनीच नव्हे तर येथील माणुसकीनेही ओळखले जाते. निसर्गाच्या या अनमोल ठेव्याला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो, आणि नुकतीच घडलेली एक घटना या सौंदर्याला “मानवी संवेदनांची किमया” लाभवून गेली.

हैदराबाद येथून आलेल्या काही पर्यटकांचा महागडा iPhone मोबाईल श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील पार्किंगमध्ये हरवला होता. पर्यटक हतबल झाले होते, कारण त्यांच्या आठवणींचा आणि दैनंदिन वापराचा एक महत्त्वाचा दुवा हरपला होता. परंतु क्षेत्रमहाबळेश्वर मनसे शाखा प्रमुख श्री. आनंद लक्ष्मण पवार यांच्या हाती मोबाईल लागला आणि त्यांनी कोणताही विचार न करता तो थेट महाबळेश्वर बसस्थानकात नेऊन संबंधित पर्यटकांना परत केला.

या प्रामाणिक कृतीने भारावलेल्या हैदराबादकरांनी श्री. पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “क्षेत्रमहाबळेश्वर खूपच सुंदर आहे. येथे केवळ निसर्गाचे वैभव नाही, तर येथील लोकांचे मन जिंकणारे वर्तनही आहे. यामुळे महाबळेश्वर आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठिकाण ठरले आहे.”

या प्रसंगानंतर पर्यटकांनी आनंद पवार यांना ५०० रुपयांची रक्कम देऊन ‘आज आपला वाढदिवस आहे, म्हणून हा लहानसा मान म्हणून स्वीकारा व साजरा करा’ अशी विनंती केली. पवार यांनी नकार दिला, तरीही पर्यटकांनी आग्रहाने रक्कम देत एक छोटीशी आठवण म्हणून छायाचित्र काढले आणि “पुन्हा महाबळेश्वरला येऊ” असे आश्वासन दिले.

महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये ४,४०० फूट उंचीवर वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. हिरव्यागार दऱ्या, प्रतापगड किल्ल्याचा इतिहास, वेण्णा तलावाचे रमणीय रूप,  येथील शांत निसर्ग, तसेच विविध पॉइंट्सवरून दिसणारे अप्रतिम सूर्यास्त हे पर्यटकांना मोहवून टाकतात. दरवर्षी लाखो पर्यटक या भूमीवर येतात आणि महाबळेश्वर त्यांना सौंदर्याबरोबरच माणुसकीची ओळख देऊन परत पाठवते.

ही घटना केवळ एका मोबाईल परत करण्यापुरती मर्यादित न राहता, महाबळेश्वरची खरी ओळख – “प्रामाणिकपणा, आत्मीयता आणि निसर्ग सौंदर्य यांचा संगम” जगासमोर मांडणारी ठरली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl