पोलादपूर तालुक्यातील विकासकामांवरील अनागोंदीवर खासदार सुनील तटकरे यांची आढावा बैठक

पोलादपूर तालुक्यातील विकासकामांवरील अनागोंदीवर खासदार सुनील तटकरे यांची आढावा बैठक

प्रकाश कदम
पोलादपूर प्रतिनिधी :

पोलादपूर तालुक्यातील विकासकामांमध्ये अनियमितता आणि कामकाजातील अनागोंदीबाबत जनतेच्या चिंता वाढत असल्याने रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार खा. सुनील तटकरे यांनी तालुक्यातील एक विशेष आढावा बैठक घेतली.

या बैठकीत खासदार तटकरे यांनी स्पष्ट केले की, लोकशाही राज्यात जनतेला अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उत्तरदायी आहेत. त्यामुळे विकासकामांतील भ्रष्टाचार, जनतेने मांडलेले प्रश्न आणि समस्यांबाबत चौकशी करून तत्काळ उत्तर देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. “या आढावा बैठकीमुळे तालुक्यातील बहुसंख्य जनतेच्या प्रश्नांबाबत समाधान मिळाले असेल, असे मी म्हणत नाही; परंतु जेवढे प्रश्न विचारले गेले, त्यापेक्षाही अधिक प्रश्न निवेदनाद्वारे प्राप्त झाले आहेत, आणि त्यांची योग्य ती कार्यवाही संबंधित अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.

बैठकीत खासदार तटकरे यांच्यासह अनेक अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये स्नेहल जगताप, सुभाष निकम, अपेक्षा कारेकर, धनंजय देशमुख, विठोबा पार्टे, अजित खेडेकर, निलेश महाडीक, अनिल मालुसरे, श्रावणी शहा, आशा गायकवाड, चंद्रकांतबुवा जाधव, प्रांताधिकारी पोपट ओमासे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसिलदार कपिल घोरपडे यांचा समावेश होता.

बैठकीत पोलादपूर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेबाबत चर्चा करण्यात आली. वझरवाडी व इतर रस्त्यांवर झालेल्या कामकाजाविषयी उपसरपंच प्रमोद मोरे यांनी माहिती दिली. पर्यटन विभागांतर्गत अनेक ठिकाणी केवळ संरक्षक भिंती व कठडे उभारण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. तसेच, जलजीवन मिशनच्या योजनांचे काम आजतागायत पूर्ण झालेले नाही आणि त्याची बिलं काढली गेली असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित जबाबदारी घ्यावी, असे निर्देश खासदारांनी दिले.

पोलादपूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने विश्रामगृहावर खर्च करून ती इमारत नष्ट करुन नव्याने बांधल्याची माहिती मिळाल्यावर तटकरे यांनी स्पष्ट केले की, “स्ट्रक्चरल ऑडीटशिवाय कोणतीही सरकारी इमारत पाडता येत नाही.” यावेळी पोलादपूर नगरपंचायतीच्या साफसफाई ठेक्यातील भ्रष्टाचाराबाबत ऍड. सचिन गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच, पोलादपूर ग्रामीण रुग्णालय आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील गैरसोयींवर देखील उपस्थितांनी आपली तक्रार मांडली.

त्याचबरोबर, तालुक्यातील साखर सुतारवाडी पुनर्वसन प्रकल्पासंबंधी तसेच इतर विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. खासदार तटकरे यांनी अधिकारी वर्गाला धारेवर धरत सर्व प्रश्नांची त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

या बैठकीत स्पष्ट झाले की, पोलादपूर तालुक्यातील विकासकामांमध्ये गुणवत्तेचा अभाव, गैरव्यवस्थापन आणि अनियमितता मोठ्या प्रमाणावर आहेत. यावर त्वरित सुधारणा करण्यासाठी प्रशासन आणि संबंधित अधिकारी सक्रिय होण्याची गरज आहे, असे खासदार तटकरे यांनी अधोरेखित केले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl