कुंभरोशी येथे उद्या मोफत आरोग्य शिबिरआरोग्य तपासण्या व उपचारासाठी ग्रामस्थांना आवाहन
कुंभरोशी (ता. महाबळेश्वर) : जिल्हा परिषद सातारा अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने “श्रीगणेशा आरोग्याचा अभियान” या उपक्रमांतर्गत गुरुवार, दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी कुंभरोशी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे शिबिर सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत शेजारील गणेश मंदिर परिसरात भरविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व तपासण्या एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे.
शिबिरामध्ये होणाऱ्या तपासण्या
- मधुमेह (Diabetes) तपासणी
- उच्च रक्तदाब (Blood Pressure) तपासणी
- कान, नाक व घसा (ENT) तपासणी
- ECG तपासणी
- हाडांचे आजार (Orthopedic problems) तपासणी
आरोग्य विभागातील तज्ञ डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत या तपासण्या केल्या जाणार असून गरजूंना योग्य उपचारासंदर्भात सल्लाही दिला जाईल.
स्थानिक ग्रामपंचायत तसेच गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. विशेषतः मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार व हाडांचे त्रास जाणवत असलेल्या ग्रामस्थांनी या शिबिरात नक्की सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment