अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा अनोखा दौराअनवाणी, दुचाकीवरून गाठला शेतकऱ्यांचा बांध – पंचनाम्याचे आदेश, मदतीचा विश्वास
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा अनोखा दौरा
अनवाणी, दुचाकीवरून गाठला शेतकऱ्यांचा बांध – पंचनाम्याचे आदेश, मदतीचा विश्वास
सातारा प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई यांनी नवरात्रोत्सवाच्या काळात अतिवृष्टीग्रस्त मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी केलेला दौरा विशेष ठरला. नवरात्रोत्सवात पायातील चपलांचा त्याग करून उपवास पाळण्याची गेली वीस वर्षांपासूनची त्यांची परंपरा यंदाही कायम राहिली. उपवास आणि अनवाणीपण या कठोर व्रताचा स्वीकार करताना, त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखातही सहभाग घेतल्याने त्यांच्या संवेदनशीलतेची पुन्हा एकदा जाणीव झाली.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले असून शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मंत्री शंभूराज देसाई यांनी बाधित भागांचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान त्यांनी कोणतीही तमा न बाळगता साध्या दुचाकीवरून चिखलातून प्रवास केला आणि अनवाणी पायाने शेतकऱ्यांचा बांध गाठला.
स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले. तसेच, "शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मदतीसाठी कोणतीही कसूर होणार नाही," असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
नवरात्रातील उपवास, अनवाणी पाय आणि प्रतिकूल परिस्थितीतही दिलेला हा दौरा लोकसेवेबद्दलच्या त्यांच्या निष्ठेचे प्रतिक ठरला. त्याग, कष्ट, कर्तृत्व आणि भक्ती यांचा संगम असलेली त्यांची कार्यपद्धती जनतेच्या मनाला भिडली आहे. समाजकार्यासाठी समर्पित आयुष्य जगणारे लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांचा वारसा मंत्री शंभूराज देसाई यांनी यशस्वीपणे पुढे नेल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले.
अतिवृष्टीच्या संकटात उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या या संवेदनशीलतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. कठीण काळात नेत्याने लोकांमध्ये जाऊन त्यांच्या दुःखाची खरी जाण ठेवणे म्हणजेच खरी लोकसेवा असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.
👉 देसाईंचा हा दौरा श्रद्धा, त्याग आणि समाजसेवेचा संगम ठरल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
Comments
Post a Comment