आठवणीत राहणारा माणूसच खरा – गवडी शाळेत कै. शंकर चव्हाण स्मृतिदिन सोहळा

गवडी प्रतिनिधी:
गवडी (ता. जावली) माजी पोलीस पाटील कै. शंकर संतू चव्हाण यांच्या 13 व्या स्मृतिदिनानिमित्त गवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्मृतिदिन सोहळा उत्साहात पार पडला. या निमित्ताने पोलीस पाटील श्री. रविंद्र चव्हाण यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, “आजच्या धावत्या युगात माणूस केवळ पद, पैसा किंवा सत्तेमुळे नव्हे तर त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे व समाजासाठीच्या योगदानामुळेच कायम आठवणीत राहतो.” हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर ठसा उमटवणारा ठरला.

कार्यक्रमात गावातील सामाजिक कार्यकर्ते रवि पाटणे यांनी शाळेसाठी CCTV कॅमेरे भेट दिले. या उपक्रमामुळे शाळेची सुरक्षा व शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश गोळे, सदस्य रोहिदास बिरामणे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन धनावडे, गणेश धनावडे (भाऊ), रवि पाटणे, सखाराम धनावडे, मुख्याध्यापिका शेलार मॅडम, मानकुंबरे मॅडम, किरण ढेबे सर, अंगणवाडी सेविका नंदा मॅडम, जयश्री सपकाळ, सुवर्णा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, शाळेसाठी कायम धडपड करणारे गणेश धनावडे (भाऊ) यांचा वाढदिवसही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गाणी व शुभेच्छांच्या वर्षावात वाढदिवस सोहळा रंगतदार केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन किरण ढेबे सर यांनी केले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl