प्रतापगड परिसरात तालुकाप्रमुख गणेश उतेकर यांचा दौरा; भवानी माते चरणी शिवसेना बळकट करण्याचा संकल्प


प्रतापगड परिसरात तालुकाप्रमुख गणेश उतेकर यांचा दौरा; भवानी माते चरणी शिवसेना बळकट करण्याचा संकल्प

प्रतापगड प्रतिनिधी :


शिवसेना पक्षाचे प्रभारी तालुकाप्रमुख गणेश उतेकर यांनी महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड परिसरात दौरा करून विविध धार्मिक स्थळांना भेट दिली तसेच नागरिकांशी संवाद साधला.

या दौऱ्याची सुरुवात पार्वतीपूर (पार) येथील श्रीराम वरदानी मातेच्या दर्शनाने झाली. दर्शनानंतर उतेकर यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या अडचणी व मागण्या जाणून घेतल्या. समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.

या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने उतेकर यांचा डॉ. सुभाष सोंडकर, डॉ. प्रकाश सोंडकर, सुभाष अण्णा सोंडकर, आनंद धनावडे यांच्यासह पार गावातील मान्यवरांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

यानंतर उतेकर प्रतापगडावर पोहोचले आणि भवानी मातेस साष्टांग नमस्कार करून दर्शन घेतले. भवानी माते चरणी त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.

दौऱ्यादरम्यान उतेकर यांनी परिसरातील शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेतल्या. आगामी राजकीय दिशा, स्थानिक प्रश्नांवरील उपाययोजना तसेच पक्षाच्या भूमिकेबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. “शिवसेनेच्या बळकटीसाठी माझे प्रयत्न सतत सुरू आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने समाजात सक्रिय राहून नागरिकांशी थेट संपर्क ठेवला पाहिजे. यामुळेच संघटन अधिक घट्ट आणि मजबूत होईल,” असे स्पष्ट शब्दांत उतेकर यांनी सांगितले.

भवानी मातेसमोर प्रार्थना करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, जनतेच्या हितासाठीचे राजकारण आणि शिवसेनेच्या विचारांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याची प्रतिज्ञा केली.

या धार्मिक व संघटनात्मक दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रद्धा आणि राजकीय बांधिलकी यांचा संगम साधणारा हा दौरा तालुक्यातील शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl