राजपुरी येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

राजपुरी येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

पाचगणी प्रतिनिधी (सचिन भिलारे) –
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांच्यात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने राजपुरी येथील कै. एम. आर. भिलारे हायस्कूलमध्ये नुकतेच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्नेह फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. जतिन भिलारे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात सुमारे २५० ते ३०० विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान गरजू विद्यार्थ्यांना मोफत औषधे आणि गोळ्यांचे वाटप करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली.

शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञांनी आपली सेवा दिली. डॉ. विशाल निकाळजे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना आरोग्यसंदर्भात आवश्यक मार्गदर्शन केले. आहारतज्ज्ञ सौ. अनुजा मसुरकर यांनी महिलांना संतुलित आहार, आरोग्यदायी जीवनशैली आणि आवश्यक सवयींबद्दल विशेष जनजागृती केली. याशिवाय, अश्विनी विभुते आणि मनीषा हमपे यांनी औषधोपचारासह विविध आरोग्यविषयक सल्ला दिला.

या उपक्रमात कैलासवासी एम. आर. भिलारे हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजपुरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंब्रळ तसेच अंगणवाडी केंद्रे येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी मान्यवरांची उपस्थितीही लाभली. प्रमुख पाहुण्यांमध्ये विनिता मॅडम, सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. आपटे, सरपंच सौ. शितल राजपुरे तसेच ग्रामीण भागातील मुलांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्ते कार्ल डिसूजा हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या शिबिरामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी आणि पालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, आयोजकांचा उपक्रम हा समाजासाठी आदर्श ठरत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl