गणेश उतेकर यांची शिवसेना महाबळेश्वर तालुका प्रभारी तालुकाप्रमुखपदी नियुक्ती – स्थानिक शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण
गणेश उतेकर यांची शिवसेना महाबळेश्वर तालुका प्रभारी तालुकाप्रमुखपदी नियुक्ती – स्थानिक शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण
जितेंद्र कारंडे
प्रतापगड प्रतिनिधी :
शिवसेना पक्षाचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते माननीय श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील श्री. गणेश नामदेव उतेकर यांची महाबळेश्वर पश्चिम तालुक्याचे प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे सचिव श्री. संजय मोरे यांनी दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले.
या नियुक्तीनंतर गणेश उतेकर यांच्यावर एक वर्ष कालावधीसाठी महाबळेश्वर तालुक्यातील संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या काळात ते वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार करून शिवसेनेच्या संघटनवाढीसाठी कार्यरत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, उतेकर यांनी स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना सोबत घेऊन संघटन अधिक मजबूत करावे व पक्षाचा जनाधार व्यापक करावा, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
नियुक्तीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना गणेश उतेकर म्हणाले, “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व विचार हेच आमचे मार्गदर्शक आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्यासाठी मी झटणार आहे. शिवसैनिकांच्या विश्वासाला पात्र ठरणे हीच माझी प्राथमिकता असेल.”
महाबळेश्वर तालुक्यात गणेश उतेकर यांचा दांडगा संपर्क असून विशेषतः तापोळा विभागात त्यांनी संघटनावर भक्कम पकड निर्माण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जातात. पक्षाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या घोषणेनंतर महाबळेश्वर परिसरात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक कार्यकर्त्यांनी गणेश उतेकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यकाळात संघटन अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment