कुंभरोशी–प्रतापगड रस्ता दुरुस्तीला सुरुवात : नागरिक व भाविकांना मोठा दिलासा

 कुंभरोशी–प्रतापगड रस्ता दुरुस्तीला सुरुवात : नागरिक व भाविकांना मोठा दिलासा

प्रतापगड प्रतिनिधी (जितेंद्र कारंडे)–
प्रतापगड मार्गावरील कुंभरोशी रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अतिशय खराब अवस्थेत होता. जागोजागी मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले होते, तर पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना व भाविकांना प्रचंड गैरसोय होत होती. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतापगडावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता रस्त्याची दुरुस्ती तातडीची गरज होती. अखेर नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले असून त्यामुळे नागरिक आणि भाविक या दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

या कामाच्या प्रारंभीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. जीतमल पालड़ियां यांनी स्वतः प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. त्यांनी कंत्राटदार व कामगारांशी चर्चा करून कामाची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. “रस्ता गुळगुळीत व सुरक्षित व्हावा, भाविकांना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये यासाठी विभाग कटिबद्ध आहे,” असे पालड़ियां यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, प्रतापगडावर दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात हजारो भाविक दर्शनासाठी गडावर येतात. खड्डेमय रस्त्यांमुळे आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात घडले होते. मात्र, आता सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे  भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

स्थानिक नागरिक, व्यापारी व वाहनचालकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुढाकाराचे कौतुक केले आहे. येत्या काही दिवसांतच रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन भाविकांना सुरक्षित प्रवासाचा आनंद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl