पारूट (ता. महाबळेश्वर) येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
पारूट (ता. महाबळेश्वर) येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
प्रतापगड वार्ताहर जितेंद्र कारंडे :
महाबळेश्वर तालुक्यातील पारूट ग्रामपंचायतीच्या सभागृहात नुकतीच ग्रामसभा उत्साहात संपन्न झाली. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत आयोजित या ग्रामसभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला
राज्य शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायतींना सक्षम व जबाबदार बनवणे.
लोकसहभागातून विकासाची गती वाढवणे.
पारदर्शकतेसह योजनांची अंमलबजावणी करणे.
गावोगावच्या गरजांची प्राधान्याने पूर्तता करणे.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार व प्रोत्साहन देणे.
अभियानाच्या कालावधीत प्रत्येक गावात ग्रामसभा, कामांचे मूल्यमापन, योजनांचा आढावा व नवे उपक्रम राबवले जाणार आहेत.
या ग्रामसभेला गटविकास अधिकारी विजय विभुते ग्राम विस्तार अधिकारी संजय पार्टे सरपंच श्री. सुनील विश्वनाथ संकपाळ, ग्राम महसूल अधिकारी श्री. अनंत शेवरे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. बी. जी. तायडे, वनरक्षक श्री. बा.म मराठे (मांगर), जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ. स्मिता निकम, मुख्याध्यापक श्री. सावंत सर, ग्रामपंचायत सदस्य श्री. विनायक जाधव, सौ. सोनाली जाधव, मा.पोलीस पाटील श्री. विष्णू जाधव, श्री. भरत जाधव, आरोग्य सेवक श्री. शंकर खराडे, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, रोजगार सेवक, बचत गटांचे अध्यक्ष/सचिव यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेले :
लोकसहभाग वाढवणे : निर्णय प्रक्रियेत प्रत्येक ग्रामस्थाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.
ग्रामपंचायतीचे स्वयंमूल्यांकन : चालू व पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेऊन पारदर्शक हिशेब ग्रामस्थांसमोर सादर करण्यात आला.
गरजांची प्राधान्यक्रमाने नोंद : रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधा सुधारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
प्रोत्साहन व पुरस्कार योजना : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कार योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
१७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानाचा समारोप ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. या कालावधीत गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी ग्रामस्थांनी एकमुखाने ठराव मंजूर केला.
Comments
Post a Comment