मंत्री भरतशेठ गोगावले यांची श्री गणेश मित्र मंडळाला भेट; देवळेगावच्या विकासासाठी कटिबद्धतेची ग्वाही


पोलादपूर प्रतिनिधी (प्रकाश कदम)

देवळेगाव येथील श्री गणेश मित्र मंडळ आयोजित गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी भेट दिली. मंडळाच्या ३२ वर्षांच्या परंपरेला सलाम करत त्यांनी गणेशभक्त व ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी ग्रामस्थांनी मांडलेल्या मागण्या ऐकून घेत देवळेगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. व मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले
मंत्री गोगावले यांच्या सोबत व्यासपीठावर राजीप माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, प्रकाश कदम, अनिल दळवी, उपतालुकप्रमुख सुरेंद्र बांदल, विभागप्रमुख रवींद्र केसरकर, ज्ञानदेव केसरकर  शंकर केसरकर, लक्ष्मण केसरकर, सचिन मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांनी मंत्र्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले.
३२ वर्षांची परंपरा

श्री गणेश मित्र मंडळाने गेल्या ३२ वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. धार्मिक उत्सव साजरा करताना मंडळाने सामाजिक जाणिवाही जपली आहे. गणपती बाप्पाच्या आराधनेसह मंडळाच्या वतीने गावातील ऐक्य, उत्सवप्रियता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य केले आहे
तुकाराम महाराज मंदिर सभागृहाची मागणी
या भेटीत ग्रामस्थांनी तुकाराम महाराज मंदिर सभागृह उभारणीची मागणी मंत्री गोगावले यांच्यासमोर मांडली. गावातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हे सभागृह अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
विकासाची ग्वाही
ग्रामस्थांचे प्रश्न ऐकून मंत्री भरतशेठ गोगावले यांनी देवलेगावच्या विकासासाठी लागणाऱ्या योजना, निधी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल.

गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात झालेल्या या भेटीत ग्रामस्थांनी मंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानले. मंडळाच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत गावकऱ्यांनी या भेटीला देवळेगावच्या प्रगतीचा नवा टप्पा मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश केसरकर यांनी केले

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl