महाबळेश्वर तालुक्यातील चंदन चव्हाण यांचे सामाजिक कार्य आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानपूर्वक अभिवादन
महाबळेश्वर तालुक्यातील चंदन चव्हाण यांचे सामाजिक कार्य आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानपूर्वक अभिवादन
महाबळेश्वर प्रतिनिधी (जितेंद्र कारंडे):
विदेशात स्थायिक असूनही आपल्या गावाला न विसरता सातत्याने समाजकारण आणि ग्रामीण जनतेच्या गरजा लक्षात घेऊन काम करणारे चंदन चव्हाण हे नाव महाबळेश्वर तालुक्यातील सर्वदूर परिचित झाले आहे. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, तसेच गरजू आणि अनाथांसाठी मदतीचे हात पुढे करून त्यांनी दुर्गम भागातील अनेकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
याच सामाजिक कार्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेली चंदन चव्हाण यांची भेट अलीकडेच विशेष ठरली.
🗓️ 30 एप्रिल 2025 रोजी गाढवली येथील ग्रामदैवत मंदिराच्या जिर्णोद्धार कार्यक्रमानिमित्त चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची छोटीशी भेट घेतली होती. त्या भेटीत शिंदे साहेबांनी ग्रामीण भागात सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून पुढील वेळी सविस्तर संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाप्रमाणे, पुढील भेटीत त्यांनी वेळ काढून चर्चा केली व चव्हाण यांच्या कामाला योग्य दिशा देण्याचे आश्वासन दिले.
चव्हाण यांनी तालुक्यात राबविलेल्या समाजसेवा उपक्रमांमध्ये –
✔️ सौरदिवे
✔️ शुद्ध पाण्याचे फिल्टर
✔️ आरोग्यसेवा व औषधोपचार मदत
✔️ शैक्षणिक सहाय्य
✔️ गरिब व अनाथांसाठी मदत
अशा विविध योजनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील काही गावांमध्ये बसविण्यात आलेले शुद्ध पाण्याचे फिल्टर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पाहण्यासाठी सादर करण्यात आले होते.
👉 या उपक्रमांचे मनःपूर्वक कौतुक करताना शिंदे साहेब म्हणाले –
“खूप छान काम करत आहात, शाब्बास! तुला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार. कारण अशी लोकं तुझ्या पाठीशी आहेत म्हणूनच तू योग्य दिशेने पुढे जात आहेस.”
या आशिर्वादाबद्दल चंदन चव्हाण व त्यांच्या पत्नीने उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष आभार मानले.
“प्रत्येक गावातील भेटीत मला समाजातील विविध मंडळी आशीर्वाद देतात, हेच माझ्या जीवनाचे प्रेरणास्थान आहे. परमेश्वर चरणी प्रार्थना आहे की समाज आणि राजकारणातील मान्यवरांकडून असेच आशीर्वाद लाभत राहोत आणि माझ्या हातून अधिक उपयुक्त कार्य घडत राहो,” असे चव्हाण यांनी नमूद केले.
महाबळेश्वर तालुक्यातील दर्या खोऱ्यात वसलेल्या दुर्गम भागातील ग्रामीण विकासासाठी झटणारे दोन रत्न –
🌿 विदेशात असूनही आपल्या गावाशी नाळ जोडून ठेवणारे चंदन चव्हाण आणि
🌿 ग्रामीण भागाविषयी मनापासून आपुलकी जपणारे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या दोघांच्या भेटीमुळे तालुक्यातील जनतेच्या अभिमानात भर पडली आहे.
🔹 “या भेटीमुळे ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना नवे दिशा मिळेल,” असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment