मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा परभणी जिल्हा दौरा : पुरग्रस्त भागांची पाहणी व आढावा बैठक
महाबळेश्वर प्रतिनिधी (विलास काळे)
राज्यातील पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील हे परभणी जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. मंत्री पाटील यांनी आज, बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता परभणी येथील शासकीय विश्रामगृहात आगमन करून मुक्काम .
उद्या, गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी ते सकाळी ११.३० वाजता धानोरा काळे (ता. पूर्णा) येथे जाऊन पुरग्रस्त व नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता ते धारासुर (ता. गंगाखेड) येथे भेट देतील. या ठिकाणी शेतकऱ्यांना झालेल्या पिकांच्या नुकसानीची माहिती घेऊन स्थानिक प्रशासनाशी चर्चा करतील.
दुपारी १ वाजता मंत्री पाटील साळापुरी (ता. परभणी) येथील पुरग्रस्त भागांना भेट देतील. त्यानंतर दुपारी २ वाजता ब्रम्हपुरी (ता. परभणी) येथे जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील.
यावेळी दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे जिल्ह्यातील नुकसान व पुरस्थिती संदर्भात महत्त्वाची आढावा बैठक घेण्यात येणार असून, जिल्हा प्रशासन, स्थानिक जनप्रतिनिधी तसेच संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत मदत, पुनर्वसन व तातडीच्या उपाययोजना यावर चर्चा होणार आहे.
यानंतर दुपारी ३.३० वाजता मंत्री पाटील परभणी येथून खाजगी वाहनाने वाशिमकडे प्रयाण करतील.
मंत्री पाटील यांच्या या दौऱ्यामुळे पुरग्रस्तांना तातडीच्या मदतीसाठी आवश्यक उपाययोजना अधिक गतीमान होण्याची अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment