महाबळेश्वर शिवसेनेकडून स्मार्ट मीटरविरोधात विद्युत महामंडळाला निवेदन

महाबळेश्वर शिवसेनेकडून स्मार्ट मीटरविरोधात विद्युत महामंडळाला निवेदन

महाबळेश्वर (प्रतिनिधी)

महाबळेश्वर शहरातील नागरिकांना जबरदस्तीने बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरविरोधात आज शिवसेना शहर शाखेतर्फे विद्युत महामंडळाच्या उपविभागीय अभियंता सौ. भाग्यश्री ढाके यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये अनेक नागरिकांचे जुने मीटर खराब झाले असून, त्याऐवजी आता थेट स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. परंतु, स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना भरमसाठ व अवास्तव बिल आकारले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे. शिवसेनेने स्पष्ट केले की, “स्मार्ट मीटर न बसवता पूर्वी जसे साधे मीटर होते तसेच मीटर बसवावेत.”

तसेच निवेदनात आणखी नमूद करण्यात आले की, जर सरकारकडून स्मार्ट मीटरबाबत कुठला अधिकृत शासकीय आदेश (जीआर) जारी केला असेल तर तो नागरिकांसमोर प्रसिद्ध करावा. अन्यथा शिवसेना शहर शाखेला नागरिकांच्या हितासाठी या स्मार्ट मीटरविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

या वेळी निवेदन देताना शिवसेना शहरप्रमुख विजयभाऊ नायडू, वाई महिला विधानसभा प्रमुख वर्षा आरडे, महिला तालुका प्रमुख मेघा चोरगे, शहर संघटक सुनील ढेबे, वैद्यकीय कक्ष प्रमुख राजूभाऊ पंडित, अल्पसंख्यांक शहर प्रमुख उस्मानभाई खारखंडे, विभाग प्रमुख प्रकाश जाधव, शाखाप्रमुख सचिन वाईकर, तसेच किरण मोरे, मुख्तार पन्हाळकर, राहुल साळुंखे, मंगेश चोरगे, जयवंत साळुंखे, शिवसैनिक अली मोहम्मद हसन वारुणकर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाबळेश्वर शहरातील नागरिकांच्या वीज समस्यांवर उपाययोजना करणे व पारदर्शकता ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे शिवसेनेने यावेळी अधोरेखित केले.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl