१७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान ८ वा राष्ट्रीय पोषण महिना — जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन
१७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान ८ वा राष्ट्रीय पोषण महिना — जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन
सातारा दि. १६ :
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार देशभरात १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ८ वा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातही विविध जनजागृती कार्यक्रम, उपक्रम आणि शैक्षणिक मोहिमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या (ICDS) जिल्हा कक्षाकडून देण्यात आली आहे.
या महिनाभराच्या अभियानाचा उद्देश सुपोषित भारत – सक्षम भारत हे ध्येय साध्य करणे हा असून, केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यक्रमांची अंमलबजावणी होणार आहे.
मुख्य विषयांवर भर :
राष्ट्रीय पोषण माहात खालील प्रमुख मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे :
- बालकांमधील लठ्ठपणा कमी करणे : साखर व तेलाचे सेवन कमी करण्याबाबत जनजागृती
- बालपणीची काळजी व शिक्षण : प्रारंभिक काळात योग्य पोषण व शिकवणीचे महत्त्व
- पोषण ही शिक्षण : पोषणाशी संबंधित ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणे
- अर्भक व बालक आहार पद्धती : लहान मुलांना संतुलित, पौष्टिक आहार देण्यावर भर
- पुरुष सहभाग : स्त्रियांसोबत पुरुषांनीही पोषण मोहिमेत सक्रिय भूमिका घेणे
- स्थानिक सक्षमीकरण व स्वावलंबन : “व्होकल फॉर लोकल” उपक्रमाद्वारे स्थानिक उत्पादनांचा प्रचार
- एकत्रित कृती व डिजिटायझेशन : कार्यक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी तंत्रज्ञान व सामूहिक प्रयत्नांचा वापर
विविध उपक्रमांचे आयोजन :
जिल्ह्यातील अंगणवाड्या, शाळा, ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून जागरूकता अभियान, पोषण स्पर्धा, प्रात्यक्षिके, आरोग्य तपासणी शिबिरे, कार्यशाळा व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येईल. महिलांमध्ये व कुटुंब पातळीवर पोषणविषयक जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
नागरिकांच्या सहभागाचे आवाहन :
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. पोषणाबाबत योग्य सवयी अंगीकारल्यास समाजात सुदृढ पिढीची जडणघडण होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
Comments
Post a Comment