खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार
खंडाळा प्रतिनिधी :
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
सभेस राज्यसभेचे खासदार नितीन पाटील, कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक, संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, तसेच विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वार्षिक सभेत गेल्या हंगामातील कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. कारखान्याच्या उत्पादन क्षमता, ऊस गाळप, शेतकऱ्यांना दिलेला दर, तसेच आगामी हंगामासाठी आखण्यात आलेली धोरणे यावर चर्चा झाली. उपस्थित मान्यवरांनी सहकार क्षेत्रातील आव्हानांवर मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कारखान्याने तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती आणि पारदर्शक व्यवस्थापन यांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
यावेळी कारखान्याच्या नवनवीन प्रकल्पांची माहिती सादर करण्यात आली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कारखाना नेहमीच कटिबद्ध राहील, तसेच सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
सभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संचालक मंडळ व कारखान्याच्या व्यवस्थापनाचे कौतुक करण्यात आले.
Comments
Post a Comment