जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी साताऱ्यात आंदोलनाची हाक
सातारा प्रतिनिधी :
महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य तसेच महाविकास आघाडी, सातारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
या आंदोलनाचा मुख्य उद्देश शासनाने आणलेला जनसुरक्षा कायदा हा जनविरोधी, घटनाविरोधी असून लोकशाही हक्कांवर गदा आणणारा असल्याचा निषेध नोंदविणे हा आहे. समितीचे म्हणणे आहे की, हा कायदा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणतो व विरोधी मतांना गप्प बसविण्याचा प्रयत्न करतो.
➡️ निदर्शनाचे तपशील :
- दिनांक : १० सप्टेंबर २०२५
- वेळ : सकाळी ११ वा.
- ठिकाण : शिवतीर्थ, पोवई नाका, सातारा
या निदर्शनात विविध सामाजिक, राजकीय संघटनांचे कार्यकर्ते, वकील, पत्रकार, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होणार असून मोठ्या संख्येने जनतेला आवाहन करण्यात आले आहे.
नेत्यांच्या म्हणण्यानुसार, हे आंदोलन केवळ साताऱ्यापुरते मर्यादित नसून राज्यभरात उग्र स्वरूप धारण करणार आहे. लोकशाहीला गळचेपी करणाऱ्या कोणत्याही कायद्याविरोधात एकत्रित लढा उभारणे हाच या आंदोलनाचा हेतू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
Comments
Post a Comment