माहिती अधिकार दिन 29 सप्टेंबर रोजी साजरा होणार

माहिती अधिकार दिन 29 सप्टेंबर रोजी साजरा होणार

सातारा प्रतिनिधी :
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्वाचा कायदा असून, त्याची व्यापक प्रसिध्दी व प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर 28 सप्टेंबर हा दिवस “माहिती अधिकार दिन” म्हणून पाळला जातो. मात्र यावर्षी 28 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे सातारा जिल्ह्यात माहिती अधिकार दिन 29 सप्टेंबर रोजी औचित्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली.

यंदा माहिती अधिकार दिनानिमित्त शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच विविध शैक्षणिक संस्था – शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे – यामध्ये जनजागृतीसाठी प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध, वक्तृत्व आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये विचारमंथन व चर्चेला वाव मिळावा यासाठी व्याख्यानमाला व चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत.

तसेच, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून समाजकार्यकर्ते व इच्छुक गट यांना सहभागी करून घेत भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमांतून नागरिकांना त्यांच्या अधिकारांची माहिती मिळून माहिती अधिकार कायदा जनतेसाठी प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

माहिती अधिकार दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, पारदर्शक व जबाबदार शासनव्यवस्था घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्याची संधी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये तसेच विविध सामाजिक संस्था यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl