सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सोबत 15 सप्टेंबर रोजी विशेष बैठकजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

📰 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सोबत 15 सप्टेंबर रोजी विशेष बैठक
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी ,  :
सातारा जिल्ह्यात महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमाचा प्रभावी प्रसार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. आधुनिक डिजिटल युगात जनतेपर्यंत शासकीय योजना आणि उपक्रमांचा संदेश वेगाने पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची विशेष बैठक सोमवार, दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत सातारा जिल्ह्यातील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय असलेल्या इन्फ्लुएन्सर्सनी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आवाहन केले आहे. महसूल विभागाच्या जनहितकारी योजना, सेवा उपक्रम, तसेच नागरिकांना थेट लाभदायक ठरणाऱ्या शासकीय उपक्रमांची माहिती व्यापक प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचविणे हे या बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात माहितीचा प्रसार सर्वाधिक प्रभावी आणि जलदगतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून होतो. या सामर्थ्यशाली साधनाचा उपयोग करून ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमाची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे अत्यावश्यक आहे. यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची साथ महत्त्वाची ठरणार आहे.”

बैठकीत इन्फ्लुएन्सर्सना जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार असून, जनजागृतीसाठी आवश्यक असलेली माहिती, व्हिज्युअल्स, तसेच अधिकृत संदेश उपलब्ध करून देण्यात येतील. नागरिकांचा सहभाग वाढावा आणि शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ही मोहीम निर्णायक ठरणार आहे.

तसेच, इच्छुक इन्फ्लुएन्सर्सनी बैठकीपूर्वी दिलेल्या QR कोडवर आपली माहिती भरून सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

👉 या उपक्रमामुळे जिल्ह्यातील युवक, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांची माहिती सहजपणे उपलब्ध होणार असून, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl