खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दरे गाव भेटीदरम्यान महाबळेश्वर तालुक्यातील शिवसेना शिंदे गट पदाधिकाऱ्यांची विकास कामांवर चर्चा
खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वागत करताना शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी
महाबळेश्वर प्रतिनिधी :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आपल्या कुटुंबासोबत तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आपल्या मूळ गावी दरे (ता. महाबळेश्वर) येथे दाखल झाले होते. या आगमनादरम्यान महाबळेश्वर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांनी खासदारांची भेट घेऊन तालुक्यातील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा केली.
या चर्चेत संभाजी भिलारे, गणेश उतेकर, श्री विठ्ठल शिंदे मामा, श्री विशाल संकपाळ (उपजिल्हाप्रमुख), श्री आनंद धनावडे (चेअरमन – शिवसागर बोट क्लब), श्री मंगेश संकपाळ (सरपंच – लाखवड), श्री लक्ष्मण शिंदे (सरपंच – कुरोशी), शंकर भोजे (रामेघर), श्री राम संकपाळ (सरपंच – वेळापूर), आवेश ढेबे (सरपंच), रमेश धनावडे (सरपंच – तापोळा), किशोर जंगम (तळदेव), चंदर कदम (विवार), राजू कदम (सोनाट), प्रकाश जाधव (सौंदरी), किसन शिंदे (सौंदरी), चंद्रकांत मोरे (गोगवे), भीवराम मोरे (वारसोली), किरण शिंदे, रणजीत शिंदे (सरपंच – दरे), बबन संकपाळ (सरपंच – अहिर) यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाबळेश्वर तालुका हा पर्यटन क्षेत्र म्हणून देशभरात प्रसिद्ध असल्याने येथे पायाभूत सुविधा उभारणी, रस्त्यांचे दुरुस्ती व विस्तार, शाश्वत पाणीपुरवठा योजना, पर्यावरण संवर्धन, तसेच स्थानिक युवकांना पर्यटन उद्योगाशी संबंधित रोजगार उपलब्ध करून देणे अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून लक्ष देण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील आवश्यक निधी, शासनमान्य योजना आणि प्रकल्प उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महाबळेश्वर तालुक्यातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment