श्री क्षेत्र महाबळेश्वरातील गणेशदादा धनावडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश


महाबळेश्वर प्रतिनिधी :
श्री क्षेत्र महाबळेश्वरातील उत्साही व तडफदार युवा कार्यकर्ते गणेशदादा धनावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करून महाबळेश्वर तालुक्यातील राजकारणाला नवा आयाम दिला आहे. धनावडे हे याआधी शिवसेना (शिंदे गट) मध्ये विभाग उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. परंतु पक्षाच्या मर्यादित चौकटीतून बाहेर पडून जनतेशी अधिक जवळीक साधण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

या पक्षप्रवेश सोहळ्यास स्वतः मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील राजेंद्र शेठ राजपुरे श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील बिरामणे, जेष्ठ कार्यकर्ते राजेंद्र पुजारी, युवा नेतृत्व प्रदीप कात्रट, अनिल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी त्यांचे मनापासून स्वागत केले.

धनावडे यांनी प्रवेशानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य तालुक्यात राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या नेतृत्वाखाली जोरात सुरू आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राजपुरे यांच्यासोबत काम करून अजित दादा पवार यांची विचारधारा गावागावात पोहोचवणे हे माझे ध्येय आहे.”

गणेशदादा धनावडे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला श्री क्षेत्र महाबळेश्वर व आसपासच्या भागात नवे बळ मिळाले असून, स्थानिक पातळीवर पक्ष संघटन अधिक मजबूत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

 महत्वाचा मुद्दा : युवा कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवणे आणि ग्रामविकासाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणे यावर धनावडे यांनी लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl