जवाहर नवोदय विद्यालय, सातारा – इयत्ता ९वी व ११वी प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित


सातारा प्रतिनिधी :
जवाहर नवोदय विद्यालय, सातारा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता नववी व अकरावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवड परिक्षेचे अर्ज मागविण्यात आले आहेत. ही माहिती विद्यालयाच्या प्राचार्या ॲन्सी ए. जे. यांनी दिली.

पात्रता निकष

  • नववी प्रवेशासाठी: विद्यार्थी शैक्षणिक वर्ष एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान इयत्ता आठवीत शिकत असावा. त्याचा जन्म १ मे २०११ पूर्वी व ३१ जुलै २०१३ नंतरचा नसावा.
  • अकरावी प्रवेशासाठी: विद्यार्थी २०२५-२६ मध्ये दहावी शिकत असावा. त्याचा जन्म १ जून २००९ पूर्वी व ३१ जुलै २०११ नंतरचा नसावा.
    वरील अट सर्वसाधारण, अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर सर्व उमेदवारांनाही लागू आहे.

आरक्षण व विशेष संधी
अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्ग, सर्व मुली व दिव्यांग संवर्गासाठी तसेच तृतीयपंथीय उमेदवारांसाठीही जागा राखीव आहेत. प्रवेशासाठी पालकांचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. विद्यार्थी डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल किंवा टॅबद्वारे अर्ज करू शकतात. अर्जासाठी नवोदय विद्यालय समितीची अधिकृत वेबसाईट https://cbseitms.nic.in/2025/nvsxi_11 ही उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : २३ सप्टेंबर २०२५
  • निवड परीक्षा : शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी ११.३० वाजता

प्राचार्या ॲन्सी ए. जे. यांनी इच्छुक विद्यार्थ्यांना व पालकांना आवाहन केले आहे की, पात्र विद्यार्थी वेळेत अर्ज करून ही संधी साधून घ्यावी.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl