सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सकपाळ यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पोलादपूर तालुका संपर्कप्रमुखपदी निवड




पोलादपूर (प्रतिनिधी : प्रकाश कदम)
पोलादपूर तालुक्यातील खोपड गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. लक्ष्मण सकपाळ यांची नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पोलादपूर तालुका संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते मा. अनंतजी गिते यांच्या सूचनेनुसार तसेच दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख मा. नागेंद्रजी राठोड यांच्या सहकार्याने जाहीर करण्यात आली.

श्री. लक्ष्मण सकपाळ यांचा जन्म खोपड येथील शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावी पूर्ण करून ते मुंबईला गेले. हॉटेलमध्ये काम करत असतानाच त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. काही काळ त्यांनी हॉटेल व्यवसाय सांभाळला तर नंतर टूर्स अँड ट्रॅव्हल्स क्षेत्रात कार्य केले.

लहानपणापासून समाजसेवेची ओढ असल्यामुळे सकपाळ यांनी गावातील तरुणांना एकत्र करून सन २०११ मध्ये श्री जननी कुंभळजा सेवाभावी संस्था या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. मागील १५ वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला व क्रीडा क्षेत्रात उपक्रम राबवले आहेत. शेतकरी बांधवांना मदत करणे, तसेच गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य करणे, हे त्यांचे विशेष कार्य आहे.

गेल्या १० वर्षांपासून ते गावच्या सचिवपदाची जबाबदारी पार पाडत असून गावातील सर्वच कामांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते लहानपणापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत.

शिवसेनेतील त्यांचा राजकीय प्रवास युवासेना विभाग संपर्कप्रमुखपदी नियुक्तीपासून सुरू झाला. नंतर पक्ष फुटीनंतर त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पोलादपूर तालुका सह-संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाली. आता त्यांच्यावर पक्षाने तालुका संपर्कप्रमुख म्हणून विश्वास दाखवला आहे.

याशिवाय श्री. सकपाळ हे –

  • अध्यक्ष, श्री जननी कुंभळजा सेवाभावी संस्था
  • उपाध्यक्ष, पोलादपूर तालुका युवक संघटना
  • उपाध्यक्ष, नायक मराठा समाज सेवा संघ, मुंबई विभाग
    या पदांवर कार्यरत आहेत.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल पोलादपूर तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl