आंबेनळी घाट एस.टी. वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी


४३ गाव समाज कोयना पश्चिम विभागाचा मंत्री भरत गोगावले यांना निवेदन

महाबळेश्वर प्रतिनिधी –
रायगड जिल्हा प्रशासनाने कुंभरोशी ते पोलादपूर या आंबेनळी घाटमार्गावर एस.टी. महामंडळाची वाहतूक बंद ठेवली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोयना पश्चिम विभागातील ४३ गाव समाजाच्या ग्रामस्थांनी एकत्रितपणे फलोत्पादन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांना निवेदन सादर केले.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंबेनळी घाट हा महाबळेश्वर तालुका आणि कोकण विभाग यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. दैनंदिन व्यवहार, शैक्षणिक कारणे, वैद्यकीय गरजा तसेच पर्यटन या सर्वच दृष्टीकोनातून या घाटमार्गाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र एस.टी. सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे, ज्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत.

लवकरच गणेशोत्सव सुरू होत आहे. या काळात मुंबईसह इतर भागांमधून कोकणात जाणाऱ्या व तेथून गावाकडे येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गावोगावचे चाकरमानी आपल्या कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येतात. मात्र आंबेनळी घाट बंद असल्याने त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामस्थांच्या मते, घाटमार्ग बंद ठेवल्याने गावाकडे येणारे चाकरमानी व पर्यटक यांना सुरक्षित आणि वेळेवर प्रवास करता येत नाही. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसतो आहे. पर्यटन व्यवसाय, शेती उत्पादनांचा बाजारपेठेत होणारा पुरवठा, तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा नियमित प्रवास या सर्वच गोष्टींवर गंभीर परिणाम होत आहे.

या सर्व बाबींचा विचार करून आंबेनळी घाटमार्गावर एस.टी. वाहतूक तातडीने सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात केली आहे. तसेच गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये एस.टी. बसेसच्या अतिरिक्त फेऱ्या सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

निवेदन स्विकारताना मंत्री भरत गोगावले यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की शासन व प्रशासनाने या मागणीवर लवकर निर्णय घेणे गरजेचे असून अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl