महाबळेश्वरातील प्रदीप कात्रट यांच्या वाढदिवसाचा जल्लोष विविध पक्ष, संघटना तसेच स्थानिक नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
---
महाबळेश्वर प्रतिनिधी :
श्री क्षेत्र महाबळेश्वरातील तडफदार, अभ्यासू व पारदर्शक कार्यकर्ते प्रदीप कात्रट यांचा वाढदिवस गावकऱ्यांच्या, युवकांच्या तसेच मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागात अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस सोहळा केवळ आनंदाचा कार्यक्रम न ठरता सामाजिक एकता, युवकांची उपस्थिती आणि स्थानिक नेतृत्वाला मिळालेली मान्यता या रूपाने विशेष ठरला.
---
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद आबा पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून प्रदीप कात्रट यांना शुभेच्छा दिल्या.
याशिवाय जिल्हा बँकेचे संचालक व युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण शेठ भिलारे, गुरेघर सरपंच रमेश शेठ चोरमले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष रोहित ढेबे, पंचायत समिती विस्तार अधिकारी सुनील पार्टे, शिव रक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिकेत काळे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष ओंकार पवार, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.) तालुकाध्यक्ष आशिष चोरगे, टॅक्सी युनियन अध्यक्ष आप्पा भिलारे, अर्बन बँक संचालक सतीश ओंबळे, मांघर सरपंच गणेश जाधव, सहकार भारतीचे दीपक बावळेकर, समाजसेवक दत्ताशेठ जाधव, वीशेठ ढेबे, मुन्नाभाई वारुणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना (शिंदे गट) कडून शुभेच्छा
या वेळी शिंदे गटाचे महाबळेश्वर शहराध्यक्ष विजयभाऊ नायडू तसेच उपशहराध्यक्ष सुनीलभाऊ ढेबे यांनी प्रत्यक्ष भेटून प्रदीप कात्रट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
बोंडारवाडीचे युवानेते अभयशेठ डोईफोडे, सुरेश डोईफोडे, तुकाराम शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला अधिकच उर्जा आणि जल्लोषाचे स्वरूप प्राप्त झाले.
श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील बिरामाने, नाना वाडेकर, राजेंद्र पुजारी, माजी सरपंच शांताराम धनावडे, उपसरपंच अनिल कात्रट, आनंद कदम, जीवन महाबळेश्वरकर यांनीही हजेरी लावून शुभेच्छा दिल्या.
सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
प्रदीप कात्रट यांना प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो युवक व समर्थकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. गावातील प्रत्येक वयोगटातील सहभागामुळे वाढदिवस उत्साहपूर्ण आणि एकतेचे दर्शन घडवणारा ठरला.
---
कात्रट यांचे मनोगत
या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना प्रदीप कात्रट म्हणाले :
“मी गावासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन वाढदिवसानिमित्त गौरव केला, याबद्दल मी मनःपूर्वक ऋणी आहे. महाबळेश्वरच्या पर्यटन व व्यवसायाला पोषक असे वातावरण आहे. थोडे प्रयत्न व कष्ट घेतले तर गावकऱ्यांचे जीवन अधिक समृद्ध होऊ शकते. या कामामुळे माझ्या कुटुंबाचे नुकसान होत असले तरी गावाच्या हितासाठी ते मी आनंदाने स्वीकारतो. गावातील प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याच्या सहभागाला न्याय मिळावा यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन.”
---
सामाजिक कार्यातून घडलेले नेतृत्व
गेल्या काही वर्षांत प्रदीप कात्रट यांनी स्वच्छता मोहिमा, पर्यावरण संवर्धन उपक्रम, रक्तदान व आरोग्य शिबिरे, क्रीडा स्पर्धा आणि शैक्षणिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रवृत्त केले आहे. पारदर्शकता, प्रामाणिकता आणि संघर्षशीलता या गुणांमुळे त्यांना स्थानिक पातळीवर विशेष लौकिक प्राप्त झाला आहे.
कार्यक्रमातील जनसहभाग, मान्यवरांची उपस्थिती आणि युवकांचा उत्साह पाहता प्रदीप कात्रट हे महाबळेश्वरमधील भविष्यातील प्रभावी नेतृत्व ठरतील, अशी चर्चा रंगली.
---
Comments
Post a Comment