आंबेनळी घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, प्रशासनाच्या पथकाची प्रतीक्षा
महाबळेश्वर/प्रतिनिधी –
महाबळेश्वर-कुभरोशी मार्गावरील आंबेनळी घाटात आज (बुधवार) पहाटे मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. मेटतलेच्या वर कावळ्याची मोरी या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती, दगड, झाडे व झुडपे आले आहेत. त्यामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरड कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रशासनाला माहिती दिली असली तरी अद्याप महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा पोलीस प्रशासनाची पथके घटनास्थळी पोहोचलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटातील माती ओलसर झाल्याने दरड कोसळल्याचे कारण समोर आले आहे. सध्या प्रवासी आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर अडकून पडले असून प्रशासनाच्या पथकाची प्रतीक्षा करत आहेत.
दरड हटवण्यासाठी जेसीबीसह यंत्रसामग्री घटनास्थळी दाखल होण्याची अपेक्षा आहे. प्रशासन पोहोचल्यानंतर दुपारपर्यंत रस्ता खुला होऊ शकेल, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित
Comments
Post a Comment