साताऱ्यातील आठ महिला कर्मचारी ‘लाडकी बहीण’ योजनेत अपात्र ठरल्या
सातारा, दि. २२ ऑगस्ट –
महिला व बालविकास विभागाच्या तपासणीत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेत काही अपात्र लाभार्थ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. पहिल्या टप्प्यातील तपासणीनुसार, राज्यभरातील एकूण 1,183 महिला या योजनेत अपात्र आढळल्या आहेत.
यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतील आठ महिला कर्मचारींचा समावेश आहे. संबंधितांची यादी महिला व बालविकास विभागाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाली असून, पुढील कार्यवाहीसाठी ती पाठवण्यात आली आहे.
साताऱ्यातील आठ कर्मचारींची नावे
सदर यादीत समाविष्ट झालेल्या महिला कर्मचारी पुढीलप्रमाणे आहेत :
- अश्विनी चंद्रकांत कांबळे
- तनुजा बाळू झिमल
- सुक्रीया अशोक गुरव
- संध्या सतीष कांबळे
- प्रतिभा धनंजय विधाते
- प्रियांका उमेश गार्डी
- अंकिता रामचंद्र लाडी
- शुभांगी संदीप रासकर
या सर्वजणी सातारा जिल्हा परिषद मुख्यालय तसेच पंचायत समितीच्या विविध विभागांत कार्यरत आहेत.
पुढील कार्यवाहीची प्रतीक्षा
या प्रकरणी कोणती कार्यवाही करायची याचे आदेश अद्याप जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले नाहीत. शासनाकडून आदेश मिळाल्यानंतर नियमानुसार पावले उचलली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Comments
Post a Comment