किसन वीरांना अभिप्रेत असणारे कार्य मकरंद आबांच्या नेतृत्वाखाली सुरू – व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे
किसन वीरांना अभिप्रेत असणारे कार्य मकरंद आबांच्या नेतृत्वाखाली सुरू – व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे
देशभक्त किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त किसन वीर कारखान्यावर आयोजित कार्यक्रमात कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. “आबासाहेब वीर यांनी सुरू केलेल्या वाटचालीला न्याय देणारे आणि शेतकऱ्यांना बळ देणारे कार्य आज नामदार मकरंद आबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ करत आहे,” असे त्यांनी सांगितले.
प्रमोद शिंदे पुढे म्हणाले की, “कारखान्याची वाताहत झालेली असताना मकरंद आबांनी जबाबदारी घेतली आणि कारखान्याला नवे बळ दिले. आजपर्यंत शेतकऱ्यांची कोणतीही देणी थकविलेली नाहीत. कारखान्याच्या बहुतेक अडचणी सोडविल्या असून उर्वरितही लवकर मार्गी लागतील. सभासद व बिगर सभासदांनी एकदिलाने कारखान्याच्या मागे उभे राहून परिपक्व ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याला द्यावा. येणारा काळ शेतकरी व सभासदांसाठी नक्कीच सुखदायी ठरेल.”
यावेळी त्यांनी ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ सोहळ्याची माहिती दिली. दरवर्षी गोकुळाष्टमीला हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आला असून लवकरच हा कार्यक्रम होणार आहे.
संचालक संदीप चव्हाण यांनी किसन वीरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याची, भूमिगत चळवळींची आणि प्रतिसरकार स्थापनेतील योगदानाची सविस्तर माहिती दिली. १९४७ नंतरच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा आढावा उपस्थितांना दिला. आभार प्रदर्शन संचालक प्रकाश धुरगुडे यांनी केले.
कार्यक्रमात ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रमोद शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर किसन वीरांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी कारखान्याचे संचालक सचिन साळुखे, रामदास इथापे, संदीप चव्हाण, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, हणमंत चवरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment