राजपुरी गणेशोत्सव मंडळाला मंत्री मकरंद आबा पाटील यांची भेट


पाचगणी प्रतिनिधी :
राजपुरी (ता. महाबळेश्वर) येथे गणेशोत्सवाचा उत्साह उंचावला असताना कार्तिकस्वामी कला क्रीडा गणेशोत्सव मंडळाला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी विशेष भेट दिली. मंडळात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे त्यांनी मनोभावे दर्शन घेतले व आरती करून गावकऱ्यांशी संवाद साधला.

या प्रसंगी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, “गणरायाच्या कृपेने सर्वांच्या मनातील मंगल इच्छा पूर्ण होवोत आणि समाजात ऐक्य, सौहार्द व प्रगतीचा संदेश मिळो,” अशी प्रार्थना त्यांनी गणराया चरणी केली. त्यांच्या उपस्थितीमुळे गावातील वातावरण भक्तिभावाने आणि उत्साहाने अधिक रंगले.

या भेटीला स्थानिक मान्यवरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राजेंद्र शेठ राजपुरे, प्रवीण भिलारे, रमेश चोरमले आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री पाटील यांचे स्वागत करून त्यांना मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली.

कार्तिकस्वामी कला क्रीडा गणेशोत्सव मंडळ हे स्थानिक पातळीवर सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम राबविण्यात अग्रेसर मानले जाते. दरवर्षी गणेशोत्सवात विविध स्पर्धा, समाजोपयोगी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून मंडळ समाजजागृतीचे कार्य करते. मंत्री पाटील यांच्या भेटीमुळे मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह दुप्पट झाला असून आगामी काळातही समाजहिताचे उपक्रम अधिक जोमाने राबविण्याचा संकल्प मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl