कोयना धरणग्रस्तांनी जमिनीसाठी अर्ज करावेत – पालकमंत्री शंभूराज देसाई


सातारा, दि. 23 : कोयना धरणामुळे जमीन गमावलेल्या पण अद्यापपर्यंत जमिनीसाठी अर्ज न केलेल्या धरणग्रस्तांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत महसूल प्रशासनाला धरणग्रस्तांसाठी पसंतीच्या जमिनी दाखविण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. ज्यांचे मुळ मालक निधन झाले आहेत, त्यांच्या वारसांनाही अर्ज करण्याची परवानगी असेल. तसेच कागदपत्रे नसलेल्या धरणग्रस्तांना प्रशासनाकडून उपलब्ध कागदपत्रे देण्यात येणार आहेत.

महिंद प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या नियमानुसार दोन एकर जमीन व 370 चौ. फुट भूखंड मिळावा, यासाठीही पालकमंत्र्यांनी सूचनांची पूर्तता केली. पुनर्वसित नागरिकांसाठी रस्ता, पाण्याची सोय, तसेच उदानिर्वाह भत्त्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

👉 गणेशोत्सवानंतर धरणग्रस्तांना जमिनी दाखविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl