विकासरत्न बाळासाहेब भिलारे — महाबळेश्वर तालुक्याचे भाग्यविधाते
🌟 विकासरत्न बाळासाहेब भिलारे — महाबळेश्वर तालुक्याचे भाग्यविधाते ✍️ जितेंद्र करंडे • प्रतापगड प्रतिनिधी • माझा गाव माझी बातमी महाबळेश्वर तालुक्याच्या विकासाचा इतिहास सांगायचा झाला, तर त्यात सर्वात उल्लेखाने ज्यांचे नाव घ्यावे लागते, ते म्हणजे लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब भिलारे . जनतेच्या मनातील “समाजभूषण”, “विकासरत्न” आणि “भाग्यविधाते” ही बिरुदे कोणत्याही पुरस्कारातून नाही… ती जनतेच्या प्रेमातून , त्यांच्या कार्यातील नि:स्वार्थी वृत्तीवरूनच दिली गेली होती. आज त्यांच्या जयंतीनिमित्त, या महान नेतृत्वाची कार्यगाथा उजळून पाहण्याचा प्रयत्न… ✅ लोकहितासाठी जन्मलेले नेतृत्व बाळासाहेब भिलारे यांच्या राजकीय प्रवासात: सत्ता ही साधन होती, लोककल्याण हे ध्येय! संघर्ष हा श्वास… आणि विकास हा निर्णय! तालुक्यातील एखादंही गाव असं नव्हतं, जिथे त्यांचा ठसा उमटलेला नाही. “समस्या माझ्या लोकांची असेल तर ती माझीच जबाबदारी” — बाळासाहेबांची अढळ भूमिका गावकऱ्यांच्या अगदी छोट्या तक्रारीपासून मोठ्या प्रकल्पांपर्यंत ते वैयक्तिकरित्या पुढाकार घेत. 🛡️ प्रशासनावर दांडगा प्रभाव त्या...